नागपूर :नागपूर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खानचे बेपत्ता प्रकरण ( BJP leader Sana Khan missing case ) अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. गेल्या 8 दिवसांत सना खानबाबत ( Sana Khan Missing Mystery ) कोणतीही माहिती समोर आली नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. सना खानचे शेवटचे लोकेशन 2 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे असल्याने ती जबलपूर येथून बेपत्ता झाल्याचे स्पष्टीकरण नागपूर पोलिसांनी दिले आहे. याशिवाय सना खान बेपत्ता झालेले ठिकाण जबलपूर असल्याने तिथल्या पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.
सना खानसोबत घातपात? :सनाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, जबलपूर पोलिसांनी सना खान 2 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. सनाचे नातेवाईक गेल्या सहा दिवसांपासून जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. सना खानसोबत घातपात झाल्याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांचे पथक तपासात मध्य प्रदेशातील जबलपूर पोलिसांना मदत करत आहेत.
असा आहे बेपत्ता होण्याचा घटनाक्रम :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना खान 1 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. सनाला जबलपूरमधील एकाने जीवे मारण्याची धमकी ( Death threats to Sana Khan ) दिली होती. जबलपूरला गेल्यानंतर दोन दिवसांनंतरही तिच्यासोबत संपर्क न झाल्याने सना खानच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस सना खानचा शोध घेत आहेत.