नागपूर- शहर भाजपच्यावतीने कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या मदत रॅली काढून १ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात येणार आहे.
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना नागपूर भाजप दीड कोटी रुपयांची करणार मदत - कोल्हापूर, सांगली
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले होते. यामध्ये लाखो कुटुंब रस्त्यावर आली आहेत. त्यांना अनेक स्तरांवरून मदत करण्यात येत आहे. त्यासाठीच नागपूर भाजपच्यावतीने दीड कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले होते. यामध्ये लाखो कुटुंब रस्त्यावर आली आहेत. त्यांना अनेक स्तरांवरून मदत करण्यात येत आहे. त्यासाठीच नागपूर भाजपच्यावतीने दीड कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. तसेच भाजपचे आमदारांनी प्रत्येकी २ लाख रुपये आणि एक महिन्याचे वेतन दिले आहे. तसेच आता सर्व नगरसेवकांना देखील मदतनिधी देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक मदतीसोबत कपडे आणि भांडी देण्याचे आवाहन नागपूरकरांना करण्यात आले आहे.