नागपूर -जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वत्र त्रासदायक आणि भीतीदायक परिस्थिती दर्शवणारे आकडे आता कमी होत चालले आहे. मृत्यूची शंभरी असून यात तीन अंकी संख्या एक अंकी झाली. त्याहून अधिक म्हणजे मृत्यूची संख्या दहाच्या आत येऊन पोहोचल्याने ही नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यात गुरुवारी आलेल्या नव्याने बाधितांची संख्या १९० वर आल्याने परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे.
नवे १९० रुग्ण -
जिल्ह्यात गुरुवारी आलेल्या अहवालात ११ हजार ३५४ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १९० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात १२१ तर ग्रामीण भागातील केवळ ६५ बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच ८ जण दगावले आहे. यामध्ये शहरी भागात २, ग्रामीण भागात २ तर जिल्ह्याबाहेरील ४ जण दगावले आहेत. तेच ५२९ जणांपैकी शहरात २६० तर ग्रामीण २६९ जण कोरोना मुक्त झाले आहे. यात १७४२ जण हे रुग्णालयात उपचार घेत असून ३ हजार ७४ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.
आतापर्यंतची परिस्थिती -