नागपूर- देशाची उपराजधानी नागपुरात गुन्हेगारांना कायद्याचा काही धाक राहिला की नाही, असा सवाल आता उपस्थितीत झाला आहे. नागपुरातील गुन्हेगारी वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील कळमेश्वर येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यावर राहत्या घरी भरदिवसा गोळीबार झाला आहे. गणेश मेश्राम व प्रिया मेश्राम अशी गोळीबार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
भरदिवसा घरात घुसून सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून पती-पत्नीवर गोळीबार.. नागपुरातील घटना - नागपूर गोळीबार बातमी
कळमेश्वर येथील लोहकरे लेआऊटमध्ये मेश्राम दाम्पत्य वास्तव्याला आहे. दरम्यान, घरात सात ते आठ अज्ञात हल्लेखोर शिरले आणि मेश्राम दाम्पत्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे ही घटना अगदी पोलीस ठाण्याच्या शेजारीच घडली. या घटनेत मेश्राम दाम्पत्य जखमी झाले आहे.

जखमींवर पोलिसांनी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर शहरातील प्रतापनगरमध्ये कुख्यात गुन्हेगार गोलू मलियाच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न गणेश मेश्राम याने केला असा आरोप आहे. त्या घटनेचा बदला म्हणून मेश्राम दाम्पत्यावर गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.