नागपूर- विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी आज नागपुरात काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत त्यांची मिमिक्रीदेखील केली.
मिमिक्री करत काँग्रेस नेते वसंत पुरके यांची मोदींवर टीका - nagpur loksabha
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी आज नागपुरात काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.
वसंत पुरके
रोजगार भ्रष्टाचार यासह विविध मुद्द्यांवर जुमलेबाजी करणाऱ्या मोदी सरकारने खोटी आश्वासने देण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही,असे ते म्हणाले. २०१४ लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदींच्या भाषणांची त्यांनी नक्कल करून दाखवली. तसेच मोदी सरकारच्या योजना आणि धोरणांवर त्यांनी टीका केली.
मोदींनी त्यांच्या भाषणांमधून नुसता घोषणांचा पाऊस पाडला. परंतु,दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत,असे ते म्हणाले.