महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची हेळसांड थांबवण्यासाठी जमायित उलमा ए संघटनेचा पुढाकार

जमायित उलमा ए नागपूर या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी केवळ मुस्लिम बांधवांवरच अंत्यसंस्कार केले नाही. तर, हिंदू, ख्रिश्चन यासह अनेक धर्मांच्या नागरिकांवर त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत. ही संस्था सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडत आहे.

जमायित उलमा ए
जमायित उलमा ए

By

Published : Sep 15, 2020, 3:41 PM IST

नागपूर : कोरोनाने माणसाला माणुसकी शिकवली, जगण्याचा ढंग शिकवला असं म्हटल जात असलं तरी कोरोनामुळे व मृत्यू झालेल्या त्या मृतदेहांचा विटाळ मात्र वाढला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे रक्ताचे नाते अंतर राखत असल्याचे सत्यदेखील कोरोना काळताच पुढे येऊ लागले आहे. एखाद्याला कोरोना होण्यापूर्वी जीवाला जीव देणारे सगे-सोयरे मात्र, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी देखील पुढे येत नसल्याने नागपुरात एक मुस्लिम संघटना पुढे सरसावली आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची हेळसांड थांबवण्यासाठी जमायित उलमा ए संघटनेचा पुढाकार

जमायित उलमा ए नागपूर या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी केवळ मुस्लिम बांधवांवरच अंत्यसंस्कार केले नाही. तर, हिंदू, ख्रिश्चन यासह अनेक धर्मांच्या नागरिकांवर त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत. ही संस्था सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडत आहे. या संस्थेच्या स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार करत समाजासमोर आदर्श घालून दिला. जमायित उलमाच्या तीन टीम सक्रिय आहेत. ज्यामध्ये जमायित उलमा अर्शद मदनी, जमायित उलमा महमूद मदनी आणि दावते इस्लामी यांचा समावेश आहे. आपल्या देशावर ज्यावेळी संकट ओढवले असेल मग ते शत्रू राष्ट्रांकडून निर्माण केलेले असो किंवा महामारीचे संकट असो. त्या-त्यावेळी भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक जाती, धर्माचे,समाजाचे नागरिक एकत्र येऊन त्या संकटाशी एकजुटीने लढा देत असल्याचा गौरवशाली इतिहास आहे.

सध्या कोविड-१९ म्हणजेच कोरोना महामारीच्या संकटाने देश बेजार झाला आहे. तीच परिस्थिती राज्याची उपराजधानी नागपुरातदेखील असल्याने आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आलेला आहे. दर दिवसाला ४० ते ६० रुग्ण कोरोनामुळे दगावत असल्याने त्या मृतदेहांवर त्यांच्या-त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करताना मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता नागपुरातसुद्धा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना वेटिंग लिस्ट वाढू लागली आहे. ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता नागपुरातील एक मुस्लिम संघटना पुढे सरसावली आहे. जमायित उलमा ए नागपूर या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी केवळ मुस्लिम बांधवांवरच अंत्यसंस्कार केले नाही. तर, हिंदू, ख्रिश्चन यासह अनेक धर्मांच्या नागरिकांवर त्यांच्या-त्यांच्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत.

ही संस्था सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडत आहे. जमियत उलमाचे अध्यक्ष हाफिस मसूद अहमद हुस्सामी, माजी नगरसेवक सिराज अहमद, जावेद अख्तर यांच्या देखरेखीखाली जमायित उलमाच्या तीन टीम सक्रिय आहे. ज्यामध्ये जमायित उलमा अर्शद मदनी, जमायित उलमा महमूद मदनी आणि दावते इस्लामी यांचा समावेश आहे. प्रत्येक टीममध्ये १२-१३ सदस्यांचे चार पथक गेल्या काही महिन्यांपासून जाती-धर्माचा भेद बाजूला सारून करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा त्यांच्या धर्मानुसार अंत्यविधी करत आहे. महानगरपालिकेकडून सूचना मिळताच जमायित उलमाचे स्वयंसेवक आपल्या कर्तव्यावर हजर होतात.

गेल्या महिन्यात नागपूरमध्ये मृतांचा आकडा चांगलाच वाढला होता. केवळ ३० दिवसांच्या कालावधीत ९१९ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर, चालू महिन्यात त्यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी त्या मृतदेहांना रुग्णालयांतून स्मशानभूमी, कब्रस्थान किव्हा ख्रिश्चन समाजाच्या सिमेट्रीत अंत्यसंस्काराला नेण्यास आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करताना यंत्रणा अपुरी पडली असल्याचे वास्तव जमायित उलमाच्या स्वयंसेवकांना समजले. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन अशा मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे निश्चीत करून कामाला सुरुवात केली.

कोरोना काळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत जमियत उलमाकडून मुस्लिम धर्माप्रमाणे १२० मृतदेहांना धार्मिक विधी पूर्ण करून दफन करण्यात आले. तर, दहा हिंदूंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन ख्रिश्चन आणि दोन बोहरा समाजातील मृतदेहांवरदेखील त्यांच्या प्रथेनुसार अंत्यविधी करण्यात आले आहेत. नागपूरात कोरोनाची दहशत इतकी वाढली आहे की कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाइक पार्थिव घेण्यास नकार देत असल्याच्या घटना वाढत आहेत. अशावेळी प्रशासनाकडून आमच्याशी संपर्क साधण्यात येतो, त्यानंतर आमची संस्था मृतावर त्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्काराचे विधी पार पूर्ण केले जात असल्याची माहिती अतिक कुरेशी यांनी दिली.

एवढंच नाही तर नातेवाइकांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्काराचे घाट निश्चित केले जाते. तसेच, अखेरच्या क्षणी नातेवाइकांना चेहरादेखील दाखवण्याची क्रिया पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details