नागपूर- यंदा ईदच्या सणावर देखील कोरोनाचे सावट आहेत. त्यामुळे ईद हा सण मुस्लीम बांधवांनी घरीच साजरा करावा, असे आवाहन नागपूर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मुस्लीम बांधवांनो यावेळी घरीच नमाज पठण करून ईद साजरी करा, प्रशासनाचे आवाहन - मोमीनपुरा नागपूर
कोरोनामुळे जगातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोनाचे सोमवारी साजरी होणाऱ्या ईद सणावरही सावट आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठण करून ईद साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला मुस्लीम धर्मगुरुंनीही प्रतिसाद दिला आहे.

नागपूरचा मोमीनपुरा हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. या परिसरातील दोनशेहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मोमीनपुरा या मुस्लीम समाज बहुल परिसरातील मुस्लीम बांधवांनी घरीच ईद साजरी करावी व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
पोलिसांच्या या आवाहनाला साथ देण्यासाठी मुस्लीम धर्मगुरू देखील पुढे सरसावले आहेत. मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठाण करून ईद साजरी करावी, असे आवाहन मुस्लीम धर्मगुरूंनी केले आहे.