नागपूर -खोलीचे भाडे मगितल्याचा कारणावरून घरमालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नागपूरच्या कळमना पोलीस ठाणाच्या हद्दीत ही घटना घडली असून रामलाल जायस्वाल असे मृताचे नाव आहे.
खोलीचे भाडे मागितले म्हणून घरमालकाची हत्या
खोलीचे भाडे मगितल्याचा कारणावरून घरमालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रामलाल जायस्वाल असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा -नागपूर: पेंच वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू; प्राण्यांच्या संघर्षात मृत्यू झाल्याची शक्यता
रामलाल हे मध्यप्रदेशच्या रिवा येथील रहिवासी होते. त्यांचे एक घर आदर्श नगर येथेही आहे. ते रिवा येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी नागपुरातील घर अंकुश नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून अंकुश भाडे देत नसल्याने रामलाल भाडे मागण्यासाठी गेले असताना अंकुशने त्यांच्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर अंकुशने आपल्या साथीदारांच्या मदतीने रामलाल जायस्वाल यांची दगडाने ठेचून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अंकुश विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपी फरार आहे.