महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder Case Nagpur: चहा प्यायला दुकानावर आला; मागावर असलेल्या गुंडांनी जागीच संपवला - बारसे नगरमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (बुधवारी) एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. अभिनव उर्फ शंकी महेंद्र भोयर असे या तरुणाचे नाव आहे. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बारसे नगरमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली.

Criminal Murder Case Nagpur
गुंडांनी त्याला जागीच संपविला

By

Published : Aug 2, 2023, 10:34 PM IST

नागपूर :शहरात आज (बुधवारी) सलग दुसऱ्या दिवशीही पुन्हा हत्येची घटना घडली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारसे नगर भागात हत्येचा थरार दिवसाढवळ्या घडला. यामध्ये त्रिकोणी प्रेम प्रकरणातून अभिनव उर्फ शंकी महेंद्र भोयर या २२ वर्षीय तरुणाची तिघांनी हत्या केली आहे.


असे घडले हत्याकांड : अभिनव उर्फ शंकी महेंद्र भोयर हा बारसे नगर भागातील एका चहाच्या दुकानात बसला होता. त्याचवेळी तिथे आलेल्या तिघांनी अभिनववर धारधार शस्त्रांनी वार केले. ज्यामध्ये अभिनवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतक हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. त्याची नाईट ड्युटी होती. सकाळी कामावरून घरी परत आल्यानंतर दुपारी चहा पिण्यासाठी दुकानात गेला असता आधीच दबा धरून असलेल्या आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. ज्यामध्ये अभिनवचा मृत्यू झाला आहे.


प्रेमाच्या त्रिकोणातून हत्या :अभिनव भोयर आणि आरोपींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. यातूनच 15 दिवसांपूर्वी आरोपीने अभिनव भोयरवर हल्ला केला होता. प्रेमाच्या त्रिकोणातून घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटेनची माहिती समजताच पाचपावली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत तीनही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील मृतक आणि आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत.


ऑगस्ट महिन्याच्या दोन दिवसात दोन हत्या :ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच हत्येची घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संघर्ष नगर भागात घडली होती. यामध्ये अज्ञात आरोपीने तुषार इंगळे नामक तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सोडून आरोपीने पळ काढला होता. तर आजही त्रिकोणी प्रेम प्रकरणातून अभिनव उर्फ शंकी महेंद्र भोयर या २२ वर्षीय तरुणाची तिघांनी हत्या केली आहे.


तुषारच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक:तुषार इंगळेची हत्या पैशाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा:

  1. Fake Kidnapping : आठवीच्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट! वाचा कसे फुटले बिंग
  2. Crime News : 3 हजार रुपयांसाठी तरुणाची चाकूने भोसकून हत्या, पाहा धक्कादायक व्हिडिओ
  3. Crime News : आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाचा काकू-बहिणीवर गोळीबार

ABOUT THE AUTHOR

...view details