नागपूर-नागपुरात क्षुल्लक करणातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. क्राईम कॅपिटल म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नागपुरात क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी वेगात चालवल्याच्या रागात 5 आरोपींनी आशिष देशपांडे नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आशिष देशपांडे याच्या हत्येप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
नागपुरात क्षुल्लक कारणातून तरुणाची निर्घृण हत्या
क्राईम कॅपिटल म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नागपुरात शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी वेगात चालवल्याच्या रागात 5 आरोपींनी आशिष देशपांडे नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आशिष देशपांडे नावाचा तरुण शांतीनगर परिसरातील रहिवासी आहे. रात्री उशिरा आशिष घरी परत येत असताना त्याने त्याची दुचाकी वेगाने चालवली. या कारणाने 5 आरोपींनी आशिषच्या घरी जाऊन त्याला जबर मारहाण केली. आरोपींनी आशिषच्या डोक्यावर आणि पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. पण जबर मार लागल्याने आशिषचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सुरज मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम आणि आदर्श नामक आरोपींवर हत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. दुचाकी वेगाने चालवल्याच्या कारणावरून आशिषची हत्या केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांनी दिली आहे. तरी या मागे आणखी दुसरे कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.