नागपूर - शहरासह जिल्ह्यातही दिवसेदिवस हत्येंच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यात सख्या भावांच्या दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा 2 हत्येच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
नागपुरातील दोघांच्या हत्येने खळबळ; दुहेरी हत्याकांडानंतर १२ तासात पुन्हा दोन हत्या - एमआयडीसी पोलीस ठाणे
मंगळवारी रात्रीपासून तर बुधवार सकाळपर्यंतच्या 12 तासात नागपुरात हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.
हत्या
मंगळवारी रात्रीपासून तर बुधवार सकाळपर्यंतच्या 12 तासात नागपुरात हत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यात मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास सदर पोलीस ठाणे अंतर्गत मंगळवारी बाजार येथे सुभाष मोहरले या तरुणाची हत्या झाली होती. तर, मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत राजीवनगर मध्ये संदीप बावनकर या तरुणाची हत्या झाली आहे.