महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एकाची हत्या - नागपूर हत्या बातमी

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एका व्यकतीचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. प्रदीप जनार्धन बागडे (४७) असे मृताचे नाव आहे.

nagpur murder
nagpur murder

By

Published : Sep 22, 2021, 3:41 PM IST

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एका व्यकतीचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. प्रदीप जनार्धन बागडे (४७) असे मृताचे नाव आहे. मृत प्रदीपचा खून चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असल्याचा संशय पोलिसांनी असून हत्या अन्य ठिकाणी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह बडेगावच्या जंगलात फेकला असावा असा अंदाज खापरखेडा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक उत्साही लोक जंगलात पर्यटन करण्यासाठी जात आहेत. त्यातील काही लोकांना खेकरानाला येथील महारकुंड शिवारातील एका पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्या लोकांनी या संदर्भात माहिती खापरखेडा पोलिसांना दिली. माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. त्यावेळी मृताच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून हा मृतदेह प्रदीप जनार्धन बागडे याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले नसले तरी मृत प्रदीपचा कुणासोबत वाद होता का, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा -पोलिसांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे - किरीट सोमैया

आरोपींनी लपवला मृतदेह -

प्रदीप बागडेचा मृतदेह आरोपींनी महारकुंड शिवारातील पुलाखाली असलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये लपवला होता. प्रदीपचा खून इतरत्र कुठे केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह सिमेंटच्या पाईपमध्ये ठेवला होता, मात्र जंगलातील प्राण्यांनी तो मृतदेह बाहेर ओढल्याने ही घटना उघडकीस आली.

ABOUT THE AUTHOR

...view details