नागपूर: घटेनच्या दोन वर्षांपूर्वी आरोपीवर पत्नीच्या हत्येचा आरोप होता. दोषी विवेक पालटकर हा तुरुंगात होता त्यावेळी त्याचे जावई कमलाकर पवनकर यांनी विवेकला सोडवण्यासाठी पैशाची मदत केली होती. विवेक तुरुंगाबाहेर आल्यानंतर संपत्तीच्या कारणावरून जावई आणि त्याच्यात वाद सुरू झाला होता. हळूहळू त्यांच्यातील वाद वाढत गेल्याने संतापलेल्या विवेकने १० जून २०१८ मध्यरात्री झोपेत असलेल्या कमलाकर पवनकर यांची हत्या केली. त्याचवेळी त्याने बहीण अर्चना पवनकर, जावयाची आई मीराबाई पवनकर, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णाची हत्या केली.
'त्या' दोघींचा थोडक्यात जीव वाचला:पवनकर यांच्या घरातील पाच जणांचे हत्याकांड घडले त्यावेळी कमलाकर पवनकर यांच्या घरात एकूण सात सदस्य होते. महत्त्वाचे म्हणजे, दोन मुली या दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. त्यात एक मुलगी ही आरोपी विवेक पालटकर आणि दुसरी मुलगी ही कमलाकर पवनकर यांची होती.
न्यायालयाने ठरवले दोषी: पाच वर्षे खटला न्यायालयात चालल्या त्यानंतर ३ एप्रिलला जिल्हा सत्र न्यायालयाने विवेकला दोषी ठरवले होते. सर्व साक्षी पुरावे आरोपी विवेकने केलेल्या निर्घृण कृत्याची साक्ष देत असल्याने आज (शनिवारी) अखेर फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने केलेला गुन्हा 'रेअर ऑफ रेअरेस्ट' गुन्ह्यांच्या प्रकारात मोडतो. त्यामुळे आरोपीला कोणत्याही प्रकारची दया दाखविली जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.