महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अजनी' होणार मल्टीमोडल स्थानक, मुख्यमंत्र्यांसह गडकरींच्या हस्ते भूमिपूजन - nagpur metro

शहराजवळील अजनी येथे मल्टिमोडल स्थानकाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

मल्टिमोडल स्थानकाचे भूमिपूजन

By

Published : Mar 7, 2019, 8:28 AM IST

नागपूर- शहराजवळील अजनी येथे मल्टिमोडल स्थानकाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. १ हजार ४०० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या या मल्टिमोडल स्थानकाद्वारे नागरिकांना रेल्वे, मेट्रो आणि बस सेवेच्या इत्यंभूत सुविधा उपलब्ध असणार आहेत.

मल्टिमोडल स्थानकाचे भूमिपूजन


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नागपुरात तब्बल १२ पेक्षा जास्त कार्यक्रमांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. गेल्या अनेक वर्षांपासून अजनी रेल्वे स्टेशन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात होते. अखेर काल मल्टिमोडल स्टेशनच्या भूमिपूजनाचा मुहूर्त साधण्यात आला.


या स्थानकावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रत्येक सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत. परिवहनाच्या बाबतीत परिपूर्ण असणाऱ्या या मल्टीमोडल स्टेशनच्या एकाच ठिकाणी रेल्वे, बस आणि मेट्रो ट्रेनची सुविधा नागपूरकरांकरता उपलब्ध असतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details