नागपूर -शिवसेनेच्या वतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात वाडी परिसरात नागपूर-अमरावती महामार्गावर आंदोलन करण्यात आले. खासदार कृपाल तुमाने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले असून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
इंधन दरवाढ मागे घेत नागरिकांना दिलासा द्या, खासदार तुमाने यांची मागणी - नागपूर शिवसेना आंदोलन
कोरोना संक्रमण काळात सर्व व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि कामधंदे ठप्प पडले असताना पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसची दरवाढ करण्यात आल्याने सर्वांचे आर्थीक गणित बिघडले. सरकारने इंधन दरवाढ तत्काळ मागे घेऊन सर्वसामान्य नागरिकांना या संकटाच्या काळात दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढीचे चटके सोसावे लागत आहेत. कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला काम, धंद्यासाठी बाहेर पडणे अनिवार्य झाले आहे. अशात पेट्रोल आणि डिझेलची रोज होणारी दरवाढ असह्य होऊ लागली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर जिल्हा शिवसेनेने आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. कोरोना संक्रमण काळात सर्व व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि कामधंदे ठप्प पडले असताना पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसची दरवाढ करण्यात आल्याने सर्वांचे आर्थीक गणित बिघडले. सरकारने इंधन दरवाढ तत्काळ मागे घेऊन सर्वसामान्य नागरिकांना या संकटाच्या काळात दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे.