नागपूर- गड-किल्यांविषयासंदर्भातला निर्णय मागे घेतल्याचा जीआर जोपर्यंत सरकार काढत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर केले आहे. तसेच गड किल्ल्यांच्या मुद्यावरून वैयक्तिक स्तरावर ट्रोल करण्यात येत असून हे चुकीचे असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
गड किल्ल्यांच्या मुद्यावरून वैयक्तिक स्तरावर ट्रोल करण्यात येत असून हे चुकीचे - खासदार अमोल कोल्हे - maharashtra government decision on fort
गड किल्यांविषयासंदर्भातला निर्णय मागे घेतल्याचा जीआर जोपर्यंत सरकार काढत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर केले आहे.
खासदार अमोल कोल्हे
हेही वाचा - मूळ कार्यकर्त्यांच्या 'आऊटगोईंग'ची धाकधूक; भाजपला अंतर्गत कलहाची भीती
गड किल्यांविषयी सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असून, याप्रकरणी सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. तसेच 'ब' प्रवर्गात नेमके कोणते किल्ले व ऐतिहासिक स्थळे येतात याचा खुलासा सरकारने करावा, अशीही मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. याबाबत वयक्तिक स्तरावर जाऊन ट्रोल करण्यात येत असून हे चुकीचे असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.