नागपूर- कौटुंबिक वादातून नागपुरात माय-लेकींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्यात आली. काल रात्री सुमारे १२ वाजता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सविता खंगार (वय ४५, आई) तर रूचिता खंगार (वय २०, मुलगी) अशी मृत दोघींची नावे आहेत. कौटुंबिक वादाव्यतिरिक्त दुसरे काही कारण आहे का? या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.
नागपूरच्या अंबाझरी तलावात उडी घेऊन माय-लेकींची आत्महत्या - नागपुरात माय-लेकींची आत्महत्या
शहरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन दोघींनी आत्महत्या केली. काल रात्री सुमारे १२ वाजता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सविता खंगार (वय ४५, आई) तर रूचिता खंगार (वय २०, मुलगी) अशी मृत दोघींची नावे आहेत.
काल मध्यरात्री या दोघींनी अंबाझरी तलावाच्या मध्यभागी असलेल्या रँम्पवरून पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चुलत्यांसोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबद्दल अंबाझरी पोलिसांना मृत महिलेच्या दुसऱ्या मुलीने कळवले. त्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत शोध घेण्यात आला. दोघींच्याही मृतदेहांचा शोध रात्रीच लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक वादाव्यतिरिक्त दुसरे कोणते कारण होते का? याची चौकशी अंबाझरी पोलीस करत असल्याचे पोलीस निरीक्षक विजय कोरे यांनी सांगितले.