नागपूर- जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने एक आठवडा लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तरीदेखील लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशी तब्बल 3 हजार 679 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी हे निर्बंध पुन्हा 31 मार्चपर्यंत वाढण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्याचे अर्थकारण संभाळत ४ वाजेपर्यंत सर्व बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नागपुरात शनिवारी 3679 नवीन कोरोनाबाधितांची भर, 29 जणांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात शनिवारी 16 हजार 387 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातून 2826 जण शहरात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तेच 850 ग्रामीण भागातून कोरोना बधितांची भर पडली आहे. यात शहरात 17 जंणाचा मृत्यू झाला असून 9 जंणाची ग्रामीण भागात मृत्यूची नोंद आहे.
आठवड्यात १२० मृत्यू-
नागपूर जिल्ह्यात शनिवारी 16 हजार 387 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातून 2826 जण शहरात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तेच 850 ग्रामीण भागातून कोरोना बधितांची भर पडली आहे. यात शहरात 17 जंणाचा मृत्यू झाला असून 9 जंणाची ग्रामीण भागात मृत्यूची नोंद आहे. यात आतापर्यंत 4592 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 27 हजार 625 इतकी झाली आहे. तेच आठवडाभरात 120 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
बाजारपेठ खुली ठेवण्यास सशर्त परवानगी-
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढीत असताना लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे मत, पालकमंत्री यांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह, आमदार यांच्यासह व्यापारी मान्यवर आणि तज्ज्ञ यांच्याकडून विचार मांडण्यात आला आहे. त्यामुळे सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत खुले करत बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात दूध डेअरी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 4333 कोरोना बधितांची भर पडली आहे. यात नागपूरात 3679, वर्ध्यात 336, भंडारा 132, चंद्रपूर 128, गोंदिया 53, तेच गडचिरोलीत 7 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यात नागपूर 29, चंद्रपूर 1 आणि वर्ध्यात 6 अश्या एकूण 36 जण कोरोनाचा आजाराने दगावले आहे. याय बेड संख्या कमी पडत असल्याने त्या वाढवण्याचा मुदाही बैठकीत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. आतापर्यंत 1 लाख 57 हजार 249 हे नागपूर जिल्ह्यात तर पूर्व विदर्भात 2 लाख 35 हजार 56 जण कोरोनातून बरे झाले आहे.