नागपूर - जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या आधीक वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या घरात पोहोचली असून मागील पाच महिन्यात एक लाखाचा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी बाधितांची संख्या 1 लाख होण्यासाठी 8 महिन्याच्या कालावधी लागला होता. यात सातत्याने सरासरी आता 3 हजाराच्या घरात आहे. मंगळवारी आलेल्या हवालात 3 हजार 095 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील तीन दिवसांच्या तुलनेत यामध्ये थोडीशी घट दिसून येत आहे.
नागपुरात 3095 कोरोना बाधितांची भर, 33 जणांचा मृत्यू - nagpur corona vaccine
नागपूर शहरात सोमवारी 14 हजार 956 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये मंगळवारी प्राप्त अहवालानुसार नागपूर शहरातील 2272 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. तेच ग्रामीण क्षेत्रात 819 नवीन बाधितांची भर पडली. यात चार जण बाहेर जिल्ह्यातील असून एकूण 3095 बाधित मिळून आले
नागपुरात 3095 कोरोना बाधितांची भर
पूर्व विदर्भात प्रमाण जास्त-
पूर्व विदर्भात मंगळवारी 3 हजार 749 कोरोना बाधितांची नोंद झाली. यात मागील चार ते पाच दिवसांच्या परिस्थितीनंतर हा आकडा चार हजाराच्या आत आल्याचे दिसून आले. तेच एकूण 39 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून त्यात 33 नागपूर जिल्ह्यात 6 जण वर्धा जिल्ह्यात नोंदवले गेलेले आहे. नागपुरात 3095, भंडारात 198, चंद्रपूर 112, गोंदिया 46, वर्धा 234 तर गडचिरोली 64 जण कोरोनातून बाधित मिळुन आले असून 2585 जण कोरोनातून मुक्त झाले.
Last Updated : Mar 24, 2021, 10:30 AM IST