नागपूर- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या सर्वाधिक असलेल्या सक्रिय रुग्णाच्या केवळ 10 टक्के रुग्ण हे आजच्या घडीला जिल्ह्यात आहे. नागपूर शहरातील एका झोनमध्ये जितके रुग्ण मिळत होते तेवढे आता जिल्ह्यात मिळत आहेत. मागील 24 तासांत 329 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून सक्रिय रुग्ण हे साडेसात हजाराच्या घरात आहेत. 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील 24 तासातील आढावा
नागपूर जिल्ह्यात शनिवारी (दि. 29 मे) 13 हजार 441 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 329 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 224 तर ग्रामीण भागातील 164 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 14 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामध्ये शहरी भागात 5, ग्रामीण भागात 5 तर जिल्हाबाहेरील 4 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच 993 जणांपैकी शहरात 597 तर ग्रामीण 396 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात 2 हजार 389 हे रुग्णालयात उपचार घेत असून 5 हजार 80 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये (गृह अलगीकरण) आहे.
आतापर्यंतची परिस्थिती