महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यात 6 हजार 364 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 113 मृत्यू - नागपूर कोरोना बातमी

नागपुरात 6 हजार 364 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून यामध्ये 4 हजार 578 रुग्ण शहरातील तर 1 हजार 780 रुग्ण हे नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत. तर उर्वरित सहा रुग्ण हे जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. जिल्ह्यात 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोविड रुग्णालय
कोविड रुग्णालय

By

Published : Apr 19, 2021, 8:50 PM IST

नागपूर -गेल्या 24 तासांत नागपूर शहरात आणि जिल्हात तब्बल 6 हजार 364 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामध्ये 4 हजार 578 रुग्ण शहरातील तर 1 हजार 780 रुग्ण हे नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत. तर उर्वरित 6 रुग्ण हे जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. एकूण सक्रिय रुग्णाची संख्या 70 हजार 397 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत नागपूर शहर आणि जिल्ह्यात तब्बल 113 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या दीड वर्षातील हा उच्चांक आहे.

कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्हात परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. आज (सोमवारी) जिल्ह्यात 17 हजार 978 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 13 हजार 448 आरटीपीसीआर आणि 4 हजार 530 अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. आज (सोमवारी) नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल 113 लोकांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतकांचा आकडा 6 हजार 386 इतका झाला आहे.

विदर्भात 230 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

गेल्या 24 तासांत केवळ नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. आज नागपूरमध्ये 113 तर विभागातील सहा जिल्ह्यात 168 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शिवाय अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -धार्मिक सलोख्याचा संदेश.. 'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा

ABOUT THE AUTHOR

...view details