नागपूर - राज्यातील काही भागात कोरोना बधितांची रुग्णसंख्या वाढत असताना उपराजधानीत तिसऱ्या दिवशी एक हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी नागपूरमध्ये 1074 रुग्णांची भर पडली. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सर्वाधिक 12396 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात वाढवण्यात चाचण्या -
तीन दिवसांपासून नागपूरमध्ये एक हजारच्यावर रुग्ण मिळत आहे. पूर्व विदर्भात जिथे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चार जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या 50 च्या जवळपास असताना, वर्ध्यात मात्र, 205 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता शनिवार आणि रविवार नागपूर आणि वर्ध्यात लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी नागपूरमध्ये आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. नागपूरमध्ये दिवसभरात 12396 जणांचे नमुने तपासण्यात आले आहे. यापैकी 8541 आरटीपीसीआर, तर 3855 अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत.