महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर; रुग्णांचे हाल - पूर्ण वेळ वैद्यकीय सेवा

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय(मेयो) येथील रूग्णांचे हाल होत आहेत. सध्या नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर आहेत. त्यामुळे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण ३० स्थानिक डॉक्टर, काही प्राध्यापक, इंटर्न डॉक्टर आणि एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहेत.

नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर

By

Published : Aug 7, 2019, 10:19 PM IST

नागपूर - राज्यातील स्थानिक निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर आहेत. याचा फटका नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाला(मेयो)बसला आहे. रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर बेमुदत संपावर गेले आहेत.

नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर
शासनातर्फे निवासी डॉक्टरांना दिले जाणारे वेतन ३ महिन्यांपासून मिळालेले नाही. पूर्ण वेळ वैद्यकीय सेवा देऊन देखील उदरनिर्वाहासाठी पैसेच मिळत नसतील, तर डॉक्टरांनी काय करावे? असा प्रश्न निवासी डॉक्टरांनी केला आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन सुरूच राहिल. असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे.
मध्य आशियातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय नागपूरचे आहे. दररोज ४ हजार रुग्ण येथे उपचारासाठी येतात. येथील निवासी डॉक्टरांची संख्या ५४० आहे. त्यापैकी ४१० डॉक्टर हे बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण ३० स्थानिक डॉक्टर, काही प्राध्यापक, इंटर्न डॉक्टर आणि एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहेत. अशीच स्थिती मेयोची देखील आहे. मेयोचे २०० निवासी डॉक्टर देखील संपावर गेले असून, २० स्थानिक डॉक्टरांवर ७०० रुग्णांची जबाबदारी आहे. निवासी डॉक्टरांचा संप असाच सूरू राहिला, तर रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details