नागपूर - महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. मान्सूनने महाराष्ट्राचा जवळपास ८० टक्के भाग व्यापला असून येत्या २४ ते ४८ तासात नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी व्यापला जाणार आहे, अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात आज आणि उद्या तुरळक पावसाचा अंदाज असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये ओलावा निर्माण झाल्यास पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूरसह विदर्भात मान्सूनची एन्ट्री; तुरळक पावसाची शक्यता - bengal
नागपूरसह विदर्भात पावसाने एन्ट्री मारली आहे. विदर्भात आज आणि उद्या तुरळक पावसाचा अंदाज असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये ओलावा निर्माण झाल्यास पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूरसह विदर्भात मान्सूनची एन्ट्री
नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील आठवड्यात आलेल्या जोरदार वादळामुळे मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. वादळानंतर झालेल्या बदलामुळे मान्सून दाखल होण्यास उशिर झाला मात्र, विदर्भात मान्सूनची एन्ट्री झाली आहे.