महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Exclusive:देशासाठी वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मेडल जिंकायचं आहे - सुवर्णकन्या मोनाली जाधव - वर्ल्ड चॅम्पियनशीप

मोनाली जाधव हिला पुढील ध्येय काय असणार आहे असे विचारले असता तिने सांगितले की, मला वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत कंपाउड प्रकरात भारतासाठी मेडल जिंकायचे आहे आणि भारताचे नाव जगात उंचवायचे आहे. असे तिने सांगितले.

सुवर्ण पदक विजेती मोनाली जाधव

By

Published : Aug 22, 2019, 11:49 AM IST

Updated : Aug 22, 2019, 6:16 PM IST

नागपूर - नुकतेच चीन येथे पार पडलेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या 'लेकी'ने दोन सुवर्ण पदकाची कमाई केली. मोनाली जाधव असे या कर्तृत्ववान लेकीचे नाव आहे. ती महाराष्ट्र पोलीस विभागातील बुलडाणा जिल्ह्याच्या जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मोनाली हिच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी...

Exclusive: सुवर्णवेध घेतलेल्या मोनालीशी ईटीव्ही भारतने केलेली खास बातचीत

यावेळी बोलताना मोनाली म्हणाली, 'धनुर्विधा हा खेळ खूप महागडा आहे. माझी घरची परिस्थिती बेताचीच आहे. मला चंद्रकांत इगल यांनी सुरुवातीपासून मदत केली. त्यांनी मला प्रशिक्षण दिले. माझी कामगिरी पाहून पोलीस खात्याने मला खेळाच्या साहित्याचे कीट उपलब्ध करुन दिले. यासोबत खात्याने मला सरावासाठी तसेच स्पर्धेसाठी मोकळीक दिली. यामुळे मी हे यश संपादित करु शकले.'

मोनालीला पुढील ध्येय काय असणार आहे असे विचारले असता तिने सांगितले की, मला वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत कंपाउड प्रकरात भारतासाठी मेडल जिंकायचे आहे आणि भारताचे नाव जगात उंचवायचे आहे. असे तिने सांगितले.

मोनालीने धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा प्रकारात सुवर्णमध्य साधून दोन सुवर्ण तर एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. चीनच्या चेंगडू येथे ८ ते १८ ऑगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

Last Updated : Aug 22, 2019, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details