नागपूर:अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रविण तोगडिया (Praveen Togadia)यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलेकी, मोहन भागवत (Mohan Bhagwatji) म्हणतात 15 वर्षात अखंड भारत निर्माण करायचा आहे. आता त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे. यासाठी पहिले पाऊल म्हणून त्यांनी कश्मीर घाटीत हिंदूला वसवावे आणि एक रात्र तिथे काढावी मी त्यांच्या सोबत असेल, संघाने पाक व्याप्त काश्मिर मधे संघाची शाखा लावावी मी त्या शाखेत असेल, तिसरे पाकिस्तानवर टॅंकवर बसून हल्ला करावा मी त्यांचा टॅंक ज्या रस्त्याने जाणार असेल तो रस्ता साफ करण्याचे काम करेल असेही प्रवीण तोगडिया यांनी म्हणले आहे .
48 तासांत भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे: सध्या भोंग्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावर बोलताना तोगडिया म्हणाले भोंगे आजचे नाहीत तर महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना सुद्धा भोंगे होते. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत केंद्र सरकारने सर्व जिल्हाधिकार्यांना, एसीपींना 48 तासांच्या आत भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे. तो प्रश्न निकाली निघेल. भाजपचे सरकार असताना भोंगे हटवण्याचा विषय केला नाही. मध्य प्रदेश गुजरात मधे भाजपचे सरकार आहे आधी तेथे भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे, आणि महाराष्ट्रात आंदोलन सुरू ठेवावे. पण सत्ता असलेल्या ठिकाणी हटवायचे नाही आणि महाराष्ट्रात आंदोलन करायचे हे चुकीचे आहे अशी टीका त्यांनी भाजवर केली.
जिहादींना गोळ्या घालण्याची गरज: गुजरात, मध्य प्रदेशात दंगे होतात, हे गुप्तचर विभागाला माहीत होत नाही हे त्यांचे अपयश आहे. पण जिहादींची हिम्मत वाढली आहे त्यांना बिर्याणी नाही तर गोळ्या घालण्याची गरज आहे. निवडणुका असल्याने रोजगारीचा प्रश्न, महागाई वाढत असल्याने तर हे दंगे होत नाही ना असा संशय व्यक्त होत आहे. हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. दंगलीमधे हिंदू आणि मुस्लिम दोघेही मरतील आणि मतदान दुसऱ्यांना होईल त्यामुळे हिंदूंनी जागृत राहण्याची गरज आहे. दंगली घडवुन राजकीय षड्यंत्र तर आखले जात नाही याकडे जनतेने लक्ष द्यावे. आणि सुरक्षित रहावे असेही तोगडिया म्हणाले.