नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोरोनवर मात केली आहे. रुग्णालयातून त्यांना सुुट्टी देण्यात आली आहे. ९ एप्रिल रोजी मोहन भागवत यांच्या शरीरात कोरोनाची लक्षण दिसली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर लगेचच त्यांना किंग्स वे या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी सात दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचे सर्व रिपोर्ट सामान्य आले. त्यानंतर त्यांना सुुट्टी देण्यात आली.
भागवत हे नागपूर येथील संघ मुख्यालयात वास्तव्यास आहेत. त्यांना नऊ एप्रिल रोजी सर्दी आणि खोकला अशी कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. दरम्यान आटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॉझिटिव्ह होण्याच्या काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला होता.