नागपूर -राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा लावून 2 हजार लिटर मोहापासून बनवलेली हातभट्टी दारू जप्त केली. रबरी ट्यूबमध्ये भरून दारूची वाहतूक करण्यात येत होती. यात दारूची वाहतूक करणारे वाहन आणि मोहाची दारू असा 2 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी वस्तीत दारूची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
नागपूर: रबरी ट्यूबमध्ये भरलेली दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त - नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभाग
शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी वस्तीत दारूची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या परिसरात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा लावून 2 हजार लिटर मोहापासून बनवलेली हातभट्टी दारू जप्त केली.
![नागपूर: रबरी ट्यूबमध्ये भरलेली दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5376907-thumbnail-3x2-daru.jpg)
दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त
दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त
हेही वाचा - वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची सुप्रिया सुळेंची इच्छा
जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. या दरम्यान रात्री गस्त सुरू असता, उमरेड मार्गावरील चांपाकडून मोठ्या प्रमाणात मोहा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर पथकाने पाचपावली पूल परिसरात सापळा लावला. या कारवाईमध्ये वाहनचालकाला अटक करण्यात आली.