महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर: कुख्यात डॉन संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावरही पालिकेचा हातोडा - Don Santosh Ambekar 2nd Bungalow

आंबेकरचा दुसरा बंगला हा त्याच्या गुन्ह्यांचा साक्षिदार आहे. महानगरपालिकेतर्फे या घराला पाडण्याची सुरुवात होत असल्याने आंबेकर विषयी नागरिकांच्या मनातील भीती देखील नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण कारवाई पोलिसांच्या सुरक्षेत पार पडली जाणार असल्याने पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा दुसरा बंगला
कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा दुसरा बंगला

By

Published : Sep 7, 2020, 9:23 PM IST

नागपूर- कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा नागपुरातील दुसरा आलिशान बंगला देखील पडायला सुरुवात झाली आहे. आज पालिकेतर्फे घराला पाडण्यास सुरुवात झाली. हा बंगला तोडण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. नागपुरातील स्वयंघोषित डॉन संतोष आंबेकरचे साम्राज्य उदध्वस्त करायला पोलिसांनी सुमारे ८ महिन्यापूर्वी सुरवात केली होती. त्या अनुषंगाने आंबेकरचा लाकडगंज परिसरात असलेला त्याचा एक आलिशान बंगला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोध पथकाने भुईसपाट केला होता. त्याच बंगल्यात बसून त्याने अनेक काळे धंदे आणि अनैतिक कृत्य केले होते.

कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा दुसरा बंगला

आंबेकरचा दुसरा बंगला हा त्याच्या गुन्ह्यांचा साक्षिदार आहे. महानगरपालिकेतर्फे या घराला पाडण्याची सुरुवात होत असल्याने आंबेकर विषयी नागरिकांच्या मनातील भीती देखील नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण कारवाई पोलिसांच्या सुरक्षेत पार पडली जाणार असल्याने पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. संतोष आंबेकरची नागपूर शहरात एकच मालमत्ता नसून त्याने अनेक मालमत्ता हडप केल्या आहेत. जुन्या बंगल्याशेजारीच त्याचे पुन्हा एक अनाधिकृत ४ मजली बांधकाम आहे. जे त्याच्या पत्नीच्या अर्थात नेहा संतोष आंबेकर यांच्या नावे आहे.

त्याचा घर क्रमांक ४८४ असा आहे. हा भाग झोपडपट्टी अंतर्गत येत असल्याने मनपाने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र स्लम अ‌ॅक्टच्या कलम ३ झेड-१ अंतर्गत नेहा संतोष आंबेकर यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीविरुद्ध नेहा आंबेकर यांनी मनपाच्या कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे प्रथम अपील दाखल केली होती. मालमत्तेसंदर्भात कुठलेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने अपील फेटाळण्यात आली. त्यानंतर नेहा आंबेकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केली. मनपा आणि आंबेकर या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर नेहा आंबेकर यांची अपील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी देखील फेटाळली.

यापूर्वी तोडण्यात आलेल्या बंगल्यामधील सामान गुन्हे शाखेने आंबेकरच्या दुसऱ्या घरात ठेवले होते. त्यानंतर घराला सील करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांतर्फे अपील फेटाळण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांच्याशी संपर्क साधून या बंगल्यामधील संपूर्ण सामान काढण्याबाबत मनपाने सूचित केले. गुन्हे शाखेने तात्काळ तेथील सामान काढून घर तोडण्याच्या कारवाईसाठी वाट मोकळी करून दिली. त्यानुसार आज मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने आंबेकरच्या दुसऱ्या घराला तोडण्यास सुरवात केली. घर सुमारे अडीच हजार वर्गफूट क्षेत्रात असून ते ४ मजलीचे आहे. दाटीवाटीच्या क्षेत्रात हे घर असल्याने संपूर्ण घर तोडण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा-धक्कादायक! नागपुरात पुरुषाच्या मृतदेहाऐवजी नातेवाईकांना सोपवला महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारापूर्वी उलगडा

ABOUT THE AUTHOR

...view details