महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा बँक घोटाळा प्रकरण: माजी मंत्री सुनील केदारांची तब्येत बिघडली; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

MLA Sunil Kedar Admit Hospital : काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळं रात्री सुनिल केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

MLA Sunil Kedar Admit Hospital
काँग्रेसचे आमदार सुनील केदार

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 9:38 AM IST

नागपूर MLA Sunil Kedar Admit Hospital : काँग्रेस पक्षाचे सावनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शुक्रवारी सुनील केदार यांना न्यायालयानं नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सुनील केदार यांची तब्येत बिघडलीय.

शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील आयसीयूत भरती : न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर केदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करत ईसीजी काढला तेव्हा, त्यांचं हार्ट रेट कमी असल्याचं आढळून आलं. त्यामुळं त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्याबरोबर आणखी एका आरोपीला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी तीन जणांना कारागृहात रवाना करण्यात आलंय. तर सुनील केदार आणि इतर एक आरोपी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अ‍ॅडमिट आहेत.

भाजपा करणार आमदारकी रद्द करण्याची मागणी : पाच वर्षांची शिक्षा झाल्यामुळं भाजपा सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार विधानसभा अध्यक्षांकडं करणार आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार आहेत.

2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा : नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल शुक्रवारी लागला. यात काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलंय. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढं खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानं या बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. याप्रकरणी केदार तसंच अन्य काही जणांवर गुन्हेही नोंदविण्यात आले होते.

हेही वाचा :

  1. सुनिल केदार यांना मोठा धक्का; जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
  2. MLA Sunil Kedar sentenced : माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा; महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण

ABOUT THE AUTHOR

...view details