नागपूर- अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार निवासातील मद्यपी टोळके आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. आज सभागृहात चर्चा सुरू असताना शेट्टी यानी हा मुद्दा मांडला व आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार - mla scahin shetty disturbed by alcohol drinkers
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज सभागृहात आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली. आमदार निवासातील मद्यपी टोळके त्रास देत असल्याची तक्रार शेट्टी यांनी केली.
![आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार nagpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5414405-thumbnail-3x2-op.jpg)
सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यभरातले आमदार नागपूरच्या आमदार निवासात राहण्यासाठी आले आहेत. वर्षभर मोकळे असलेल्या या आमदार निवासाला दारूड्यांनी आपला अड्डा बनवला आहे. आता आमदार आले तरी दारूडे काही तिथून जायला तयार नाहीत. यामुळे आमदारांना या मद्यपींपासून त्रास होत असल्याचे समोर आले आहे. आमदार निवासातील मद्यपी टोळके आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभागृहात केली आहे. आमदार शेट्टी यांना ४ अज्ञात व्यक्तींनी दारू पिण्यासाठी ५०० रुपये मागितले. आमदार कल्याणशेट्टी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारूड्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी आमदारांच्या मदतीसाठी पोलीस आमदार निवासात उपस्थित नसल्याचे सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-'काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?'