नागपूर -जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा राज्यातील भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे फडणवीस, यासाठी जबाबदार आहेत, असे कुठलाही भाजप नेता म्हणाला नाही. मात्र, भाजप मतदारांची नाराजी ओळखण्यात कुठेतरी कमी पडल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे म्हणाले.
जनतेची नाराजी ओळखण्यात कमी पडल्यामुळे जिल्हा परिषदेत अपयश - समीर मेघे - नागपूर जिल्हा परिषद निवडणूक
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ 11 वरून 6 वर आले होते. त्यावेळी मतदारांनी नाराजी दाखवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने मतदारांना गृहीत धरल्यानेच त्यांना हा पराभव पाहावा लागला असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ 11 वरून 6 वर आले होते. त्यावेळी मतदारांनी नाराजी दाखवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने मतदारांना गृहीत धरल्यानेच त्यांना हा पराभव पाहावा लागला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांना 4 उमेदवार जिंकून आणण्यात यश आल्यानेच भाजप 15 पर्यंतची संख्या गाठू शकली आहे.
जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारला आहे. जनतेचा आणि मतदारसंघात इतका विकास करून देखील जनतेने आम्हाला सत्तेपासून दूर राहण्याचा कौल का दिला? याचा अभ्यास करणार असल्याचे समीर मेघे यांनी सांगितले. भाजपने केलेला विकास हा नागपूर शहरापुरता मर्यादित राहिला, तर ग्रामीण भागाला विकासाचा चेहराच दिसला नसल्याचा मतप्रवाह वाहत आहे. मात्र, समीर मेघे यांनी हा मुद्दा खोडून काढला आहे.