महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil: अर्वाच्च भाषा पडली महागात! राष्ट्रवादीचे जयंत पाटील अधिवेशनातून निलंबित - Jayant Patil

विधानसभा अध्यक्षांच्या प्रति अशोभनीय शब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. नागपूर अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Dec 22, 2022, 3:51 PM IST

Updated : Dec 22, 2022, 5:23 PM IST

जयंत पाटील माध्यमांशी बोलताना

नागपूर - विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यासंदर्भात सांगितले की, घडलेला प्रकार अत्यंत अयोग्य होता. कुणीही अशा प्रकारे शब्द उच्चारू नये. या प्रकरणांमधून मार्ग काढावा. चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी विनंती अजित पवार यांनी केली. निलंबनाचा ठराव मागे घ्यावा अशीही विनंती पवारांनी केली. दरम्यान विधानसभा अध्यक्ष यांच्या प्रति अशोभनीय शब्द वापरल्याबद्दल जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली निलंबनाची घोषणा. नागपूर अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत सदस्यत्व निलंबित करण्यात आले. विधिमंडळाच्या परिसरात येण्यासही बंदी घालण्यात आली. आचरण व नीती मूल्य समिती गठित करण्याची घोषणाही त्यांनी केली.



विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द - पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्यावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे सभागृहात अध्यक्ष यांना विनंती करीत होते याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पवार पाटील हे सुद्धा विधानसभा अध्यक्षांना भास्करराव यांना बोलण्याची संधी देण्याबाबत विनंती करीत होते मात्र विधानसभा अध्यक्षांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नव्हता या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरला.

जयंत पाटलांनी मागितली माफी -जयंत पाटील यांच्याकडून तोंडून अपशब्द निघाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा शब्द पकडून जयंत पाटील यांचा सभागृहात निषेध केला तसेच त्यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी केली त्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तर खूप करण्यात आले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाची माफी मागितली मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ माफी मागून चालणार नाही अशा पद्धतीने अध्यक्षांचा अपमान होणार असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा ही प्रथा सुरू होईल त्यामुळे निलंबनाची मागणी करावी अशी विनंती केली.

चंद्रकांत पाटलांनी मांडला ठराव -दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अससदीय शब्द वापरल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्या विरोधात नागपूरचा अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्याचा ठराव मांडला तसेच आचरण आणि नीतिमूल्य समिती गठीत करण्याची विनंती केली. चंद्रकांत पाटील यांनी मांडलेला हा ठराव विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या जोरावर मंजूर करीत जयंत पाटील यांचे नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केले आहे त्यामुळे जयंत पाटील यांना नागपूर किंवा मुंबई विधानमंडळाच्या परिसरात येण्यास या कालावधीत बंदी राहणार आहे. दरम्यान, या निलबनाच्या घोषणेनंतर नाराजी व्यक्त करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.

Last Updated : Dec 22, 2022, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details