नागपूर - संपूर्ण जगात स्त्री शक्तीचा जागर होत असताना नागपुरात एका अल्पवयीन भावाने स्वतःच्याच लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी घटना उजेडात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पीडिताच्या पोटात दुखत असल्याने तिची आई तिला घेऊन रुग्णालयात गेली असता ही घटना समोर आली आहे. आरोपी आणि पीडिता दोघेही सख्खे बहीण-भाऊ आहे. आरोपीला अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
नागपुरात नात्याला काळीमा; अल्पवयीन बहिणीवर सख्ख्या भावाचा लैंगिक अत्याचार - गर्भवती
नागपुरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन भावाने स्वतःच्याच लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. पोलिसांनी आरोपी अटक करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
पीडिता ही १६ वर्षांची आहे तर आरोपी साडेसतरा वर्षांचा आहे. पीडितेचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर असतात. दिवसभर दोघेही घरीच राहायचे. ३ महिन्यांपूर्वी आरोपीने स्वतःच्याच बहिणीवर अत्याचार केला. घटनेची वाच्यता कुठेही केल्यास परिणाम वाईट होतील अशा प्रकारची भीती दाखवल्यानंतर पीडिताने आपले तोंड बंद ठेवले. या घटनेला ३ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर त्या मुलीच्या पोटात सतत दुखत असल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यावेळी ती ३ महिण्याची गर्भवती असल्याची बाब समोर आली. पीडिता अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी लागलीच याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून तिच्या सख्खा भावाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाची रवानगी बालसुधार गृहात केली आहे.