महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Boy Suicide Nagpur : धक्कादायक! खेळून घरी परतलेल्या ११ वर्षांच्या बालकाची आत्महत्या - अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Minor Boy Suicide Nagpur : खेळून परत आलेल्या एका 11 वर्षीय बालकाने त्याच्या खोलीत जाऊन आत्महत्या केली. (Suicide of child at home) ही घटना काल (रविवारी) नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील डिगडोह भागात घडली. (suicide of minor in Digdoh area) आज सकाळी या घटनेचा उलगडा झाला. या घटनेने मृत बालकाच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

Minor Boy Suicide Nagpur
बालकाची आत्महत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 9:56 PM IST

नागपूर : Minor Boy Suicide Nagpur :नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील डिगडोह येथे एका ११ वर्षीय बालकाने घरातल्या खोलीतचं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बालकाने आत्महत्या का केली असावी या बाबत कुटुंबाला काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

खेळून आल्यावर केली आत्महत्या:मृत बालकाचे वडील मध्यप्रदेशात नोकरीत आहेत. त्यामुळे तो आई आणि दोन बहिणींसोबत डिगडोह भागात राहत होता. रविवारी सायंकाळी तो खेळून घरी परतला होता. घटनेच्या वेळी त्याचे आजोबा छोटेलाल हे एका कार्यक्रमात गेले होते. तर आई शिला आपल्या एका मुलीसोबत बाहेर गेली होती. दुसरी मुलगी घरातचं अभ्यास करत होती. मृत बालक बाहेरून आला आणि त्याने आतल्या खोलीत जाऊन आत्महत्या केली. काही वेळाने त्याची बहिण खोलीत गेली असता तो तिला मृतावस्थेत आढळला. तिने तात्काळ याची माहिती शेजारी व कुटुंबातील सदस्यांना दिली. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.


बालकाने आत्महत्या का केली असावी? ११ वर्षीय बालकाने आत्महत्या का केली असावी, या बाबत अद्याप कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेजला पाठवला आहे. इतक्या कमी वयात बालकाने आत्महत्या का केली? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

मोबाईलच्या हट्टापाई आत्महत्या: अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सप्टेंबर, 2022 मध्ये घडली होती. यामध्ये आईने मोबाईल घेऊन न दिल्यामुळे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती. बारामती तालुक्यातील क-हावागज येथे ही घटना घडली गुरुवार 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृत शुभम येथे इयत्ता नववीमध्ये शिकत होता. याबाबत राजेंद्र अशोक लष्कर (वय 27 वर्षे, रा. करावागज लष्करवस्ती, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली होती.

परिस्थिती हलाखीची, पण मुलाचा मोबाइलसाठी हट्ट: शुभमने आईकडे मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली होती. परंतु, परिस्थिती हलाखीची असल्याने शुभमच्या आईला मोबाईल घेऊन देणे शक्य झाले नाही. म्हणून नैराश्यातून 14 वर्षांच्या शुभमने आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत होती.

हेही वाचा:

  1. Kota Student Suicide : विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोटाच्या कोचिंग सेंटरवर गुन्हा दाखल
  2. Maratha Youth Suicide Nanded: आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या तरुणाची आत्महत्या, प्रश्न निकाली काढण्याची मराठा सकल समाजाची मागणी
  3. Restrictions On Ajantha Bank : अजिंठा बँकेवर निर्बंध येताच खातेदाराने केला आत्महत्येचा प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details