नागपूर- अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने मदतही जाहीर केली आहे. शिवाय येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत पोहोचणार आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने किती मदत दिली? असा सवाल राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आज नागपुरात पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी केंद्र सरकारला सवाल केला. विरोधीपक्ष फक्त राज्य शासनावर टीका करायचे म्हणून टीका करत असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी यावेळी केला.
राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यात विदर्भातील शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. शिवाय राज्याला मदतीचा निधी कमी पडत आहे. अशावेळी केंद्राला वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यावर केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. याचा अर्थ केंद्राच्या मनात काळ बेरे असल्याची टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य शासन म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळीच मदत पोहोचण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मात्र विरोधी पक्षाचा केवळ टीका करण्याचा हेतू असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
पथकाचा पत्ताच नाही-