नागपूर -ओबीसींच्या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती. ( Hearing on OBC Reservation ) मात्र निवडणूक आयोगाने अर्ज केल्याने ही सुनावणी 2 मार्चला होणार आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. ( Supreme Court on OBC's Political Reservation ) यात निवडणूक आयोगाच्या अर्जात त्यांनी काही मागणी केली का? हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, आणखी काही कागदपत्रांची मागणी केल्यास त्याची पूर्तता राज्य सरकार करेल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशीच महाराष्ट्र सरकारची भूमिका आणि प्रयत्न असणार आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ( Minister Vijay Wadettiwar on OBC Reservation )
युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी ग्रामीण केंद्र सरकारच्या संपर्कात आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी आहे, याची माहिती आम्ही गोळा केलेली आहे. तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहे. केवळ दोन विमान पाठवून काही सर्व विद्यार्थी आले असे नाही. तिथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणण्यासाठी युद्धपातळीवर काम झाले पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. युद्धामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. मात्र, ऑपरेशन गंगा वाहून जाऊ नये म्हणजे झाले. युक्रेन रशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना इतर देशांनी आपल्या देशातील लोकांना 15 दिवसांपूर्वी त्या देशातुन परत काढण्याचे काम सुरू केले होते. मात्र, भारताने तशा पद्धतीचे कुठलेच पाऊल उचलले नाही, अशी टीकाही मंत्री वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर केली.
राज्यपालांच्या वक्तव्याने महाराज प्रेमी दुखावले -