महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 20, 2021, 3:20 PM IST

Updated : Feb 20, 2021, 5:07 PM IST

ETV Bharat / state

काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार - मंत्री वडेट्टीवार

काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार आहे. मात्र, त्याबद्दल स्थानिक प्रशासनाला निर्णय घ्यायचे आहेत. जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

नागपूर
नागपूर

नागपूर- वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार आहे. मात्र, त्याबद्दल स्थानिक प्रशासनाला निर्णय घ्यायचे आहेत. जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले.

नागपूर

लोकांनी कोरोना संक्रमण थांबवण्यासंदर्भात सरकारच्या सूचनांचे पालन केले नाही, तर पुन्हा टाळेबंदी लावण्याची वेळ येऊ शकते. शाळा सुरू ठेवायच्या का नाही, 10 वी, 12 वीच्या परीक्षा कशा घ्याव्यात? याबद्दल पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, शाळेबद्दल निर्णय शिक्षणमंत्री घेतील. राजकीय आंदोलने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने केली जात आहेत. मात्र, कोरोना परिस्थिती पाहता अशी आंदोलने केली जाऊ नयेत, असे माझे आवाहन आहे. सर्वच पक्ष्यांनी काळजी घेऊन आंदोलनापासून दूर राहावे.

काही शहरात कोरोनाचा प्रकोप वाढतोय

मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यासह काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. याबाबत बरेच तर्क-वितर्क आहेत. नवीन कोरोना प्रकार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. नागरिक तोंडाला न बांधता फिरत आहेत. या परिस्थितीत सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असेही वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीविषयी बोलताना, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी लोकांनी योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळले जाणे, लग्न संमारंभात मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणे, यासारख्या गोष्टी टाळल्या नाही तर परिस्थिती गंभीर होईल. टाळेबंदी करण्याची वेळ पुन्हा येईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

स्थानिक परिस्थिती पाहुन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा..

मंगल कार्यालयांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 6 ते सकाळी 9 पर्यंत रात्रीची संचारबंदी करण्याचा विचार सुरू आहे. पण, लोकांचा बिनधास्तपणा पाहता टाळेबंदी होणार, असे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहुन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावे, अशा सूचना दिल्या आहे. त्या-त्या भागातील रुग्णसंख्या पाहुन निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना दिले असल्याचे वडेट्टीवार म्हणालेत.

सर्वच राजकीय पक्ष्यांनी आता आंदोलनापासून दूर राहावे..

राज्यात आमचे सरकार आहे, म्हणून भाजप वीज बिलावरून आंदोलन करत आहे. डिझेल-पेट्रोलचे भाव वाढले, आमच्या लोकांनी रस्त्यावर उतरले तर वाईट काय आहे. गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर ज्यापद्धतीने वाढत आहेत. त्यामुळे आंदोलन करावे लागते. सर्वच पक्षांनी काळजी घेऊन आंदोलनापासून दूर राहावे असेहीते म्हणालेत. शाळा सुरू ठेवायची की नाही आणि 10 वी, 12 वीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्या की ऑफलाईन घ्याव्यात. याबद्दल निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. शाळेबद्दल शिक्षण मंत्र्यांनी आढावा घेतला आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा ते शिक्षणमंत्री ठरवतील.

कॅबिनेटमध्ये विदर्भ विकास माहामंडळाबद्दल चर्चा झाली आहे. या बद्दल लवकर निर्णय होईल. अगोदरच राज्यपालांनी 12 आमदारांच्या विषयात निर्णय घेतला नाही. तेच वैधानिक विकास मंडळासाठी अध्यक्षांची नावे दिल्यावर पुन्हा राजकारण होईल. पण यावरही निर्णय होईल. विदर्भातील निधी पळवला जाणार नाही. आम्ही पहारेकरी म्हणून त्यांच्या मागे लागू, आमच्या हक्कांचा निधी अडवण्यासाठी आम्ही विदर्भात काम करणारे सक्षम आहोत. तसे काही झाले असल्यास विरोधी पक्ष नेत्यांनी समोर आणून द्यावे, आम्ही त्याचा पाठपुरावा करू, असेही वडेट्टीवार म्हणालेत.

Last Updated : Feb 20, 2021, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details