महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी व्यापक जनजागृती करा-सुनील केदार

जिल्हा परिषदेच्या सर्व जनप्रतिनिधींनी व्यापक जनजागृती करून सर्वसामान्य जनतेला कोरोना लसीकरणा बाबत जागरूक करावे, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर तसेच सर्व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते.

मंत्री सुनील केदार यांनी आढावा बैठक घेतली
मंत्री सुनील केदार यांनी आढावा बैठक घेतली

By

Published : Apr 10, 2021, 3:54 PM IST

नागपूर- कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. सद्य परिस्थितीत फक्त लसीकरण हाच कोरोनावर उपाय दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व जनप्रतिनिधींनी व्यापक जनजागृती करून सर्वसामान्य जनतेला कोरोना लसीकरणा बाबत जागरूक करावे, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्यकार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर तसेच सर्व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या संपूर्ण विभागांचा आढावा सुनील केदार यांनी घेतला. कोरोना महामारीच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर उघडणे, लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करणे, वेकोली(WCL) व मोईल( MOIL) यांचे हॉस्पिटल कोविड सेंटर मधे रूपांतर करणे यासंबंधीचे निर्देश मंत्री सुनील केदार यांनी दिले. त्याचबरोबर आवास योजनेचा लाभ सर्व गरजू लोकांपर्यंत पोहोचविणे, शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेतील अर्जदारांच्या सर्व त्रुटी पूर्ण करण्याचेही निर्देश दिले.

१५ दिवसात आढावा घेणार

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमात अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी यांनी समाज माध्यमातून जनतेला लसीकरणाबाबत माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व कामांचा आढावा मंत्री सुनील केदार यांनी घेतल्यानंतर येत्या १५ दिवसात पुन्हा विस्तृत आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details