नागपूर - दिवाळीत वाटप केलेल्या आनंद शिधामधील Anandacha Shidha Distribution काही वस्तू निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्यानंतर सरकारने कारवाईचा इशारा दिला होता. आता दोन महिन्यानंतर शिल्लक असलेला आनंदाचा शिधा Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha संपेपर्यंत वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण Minister Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha यांनी विधान परिषदेत दिली.
नेतेमंडळींचा फोटो नसल्याने शिधा वाटपास विलंबविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Opposition Leader Ambadas Danve यांनी आनंदाचा शिधावाटप Anandacha Shidha Distribution प्रक्रियेत झालेल्या अनिमिततेबाबत लक्षवेधी मांडली होती. शिवसेनेच्या सदस्यांनी याला पाठिंबा देत, या प्रक्रियेतील कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. आनंदाचा शिधासाठी Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha काढलेले 500 कोंडीचे टेंडर संशयास्पद पद्धतीने तीन दिवसात मंजूर केले. पिशव्यांवर नेतेमंडळींचा फोटो नसल्याने शिधा Anandacha Shidha Distribution वाटप करण्यास विलंब केला गेला. अनेक भागात १०० रुपयांऐवजी जास्त पैसे आकारले गेले. निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा शिधामध्ये समावेश होता, अशा विविध प्रश्नांचा भडीमार शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, सचिन अहिर यांनी केला. योजनेचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असला, तरी तो साध्य झाला नसल्याचा आरोप करत योजनेची चौकशी करावी, अशी विधानपरिषदेत मागणी करण्यात आली. मंत्री रविंद्र चव्हाण Minister Ravindra Chavan Statement On Anandacha Shidha यांनी यावर स्पष्टीकरण दिले.