महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'द्वारे सर्वप्रथम लस घेणाऱ्या ६२ वर्षीय शरनाज डॉवर यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय लस घेण्यासाठी व्हिलचेअरवर आलेल्या ६६ वर्षीय मायाराणी विनोद शर्मा, ८९ वर्षीय श्रीमती लक्ष्मीदेवी यांचेही स्वागत करण्यात आले. घरात बसून असलेले आजारी ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मंत्री  नितिन गडकरी
मंत्री नितिन गडकरी

By

Published : May 14, 2021, 9:10 PM IST

Updated : May 14, 2021, 10:34 PM IST

नागपूर -नागपूर मनपाकडून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'ची सुरुवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौकातील ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये नागरिकांसाठी 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'चा शुभारंभ झाला आहे.

नागपुरात 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'
'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'द्वारे सर्वप्रथम लस घेणाऱ्या ६२ वर्षीय शरनाज डॉवर यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय लस घेण्यासाठी व्हिलचेअरवर आलेल्या ६६ वर्षीय मायाराणी विनोद शर्मा, ८९ वर्षीय श्रीमती लक्ष्मीदेवी यांचेही स्वागत करण्यात आले. घरात बसून असलेले आजारी ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात कोविशिल्डचा दुसरा डोस अथवा पहिला डोस घेऊ पाहणाऱ्या ६० वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकानी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले आहे.



आधार कार्ड, पॅनकार्ड लसीकरणासाठी आवश्यक

'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन'द्वारे ६० वर्षावरील नागरिकांना त्यांच्या वाहनामध्ये कोविशिल्ड लस दिली जात आहे. यासाठी पात्र नागरिकांनी घरातील व्यक्तींबरोबर लसीकरण केंद्रावर आपले आधार कार्ड किंवा पॅनकार्ड सोबत घेऊन जावे. नोंदणी झाल्यानंतर ज्येष्ठांना त्यांच्याच वाहनामध्ये लस दिली जाते. यानंतर काही वेळ देखरेखीत ठेवून आवश्यक औषधे देऊन नागरिकांना घरी पाठविण्यात येत आहे.



वयोवृद्धांची रांगेतून मुक्तता

शहरातील लसीकरण मोहिमेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी वेगळी व्यवस्था असावी, याबाबत ज्येष्ठ नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे. 60 वर्षावरील वयोवृद्ध नागरिक हे लसीकरण केंद्रावर गर्दीत तासन तास प्रतीक्षा करणे शक्य नाही. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव इन व्हॅक्सिनेशन' हा सोयीचा उपक्रम ठरत आहे. यात घरातून स्वत:च्या वाहनात बसून लसीकरण केंद्रावर यावे, वाहनातच लस दिल्या जाणार आहे. त्यामुळे वयोवृध्दांची रांगेतून सुटका होणार आहे.

हेही वाचा -केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती ऑक्सिजनचा पुरवठा केला, याची माहिती जाहीर करावी - अजित पवार

Last Updated : May 14, 2021, 10:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details