महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 27, 2021, 3:36 PM IST

Updated : Feb 27, 2021, 4:52 PM IST

ETV Bharat / state

नागपुरात मिनी लॉकडाऊन; पण अत्यावश्यक सेवेसोबत दारूची दुकाने खुली?

नागपूरात मोठया प्रमाणात नागरिक मास्क योग्यरित्या लावत नसल्याचे सुद्धा दिसून येत आहे. बरेच लोक हे चेहऱ्यावर मास्क लावत आहे. नाक आणि तोंड झाकले जावे, अशा पद्धतीने मास्क लावण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

नागपुरात मिनी लॉकडाऊन
नागपुरात मिनी लॉकडाऊन

नागपूर- शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील तीन दिवसात रोज दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्येत वाढ होऊ नये म्हणून नागपूर शहरात दोन दिवसांचे मिनीलॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनदरम्यान आत्यावश्यक सेवेसोबत दारूची दुकानेही खुली ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दारूच्या दुकांनांना देण्यात आलेल्या परवानगीवर नागरीकांनी आक्षेप घेतला आहे.

नागपुरात मिनी लॉकडाऊन


महापौरांकडून पाहाणी
नागपूरात मिनी लॉकडाऊन असल्याने माहापौर दया शंकर तिवारी यांनी बाजारपेठेचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. सुरुवातीला महापौरांकडून इतवारी भागाची पहाणी करण्यात आली. यानंतर शहरातील गजबलेल्या गोकुलपेठ परिसराची पहाणी करण्यात आली.

नागपुरात मिनी लॉकडाऊन
मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

नागपूरात मोठया प्रमाणात नागरिक मास्क योग्यरित्या लावत नसल्याचे सुद्धा दिसून येत आहे. बरेच लोक हे चेहऱ्यावर मास्क लावत आहे. नाक आणि तोंड झाकले जावे, अशा पद्धतीने मास्क लावण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. नागपूरात मनपाच्यावतीने मास्क न लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत मनपाने ३४ हजार लोकांवर कारवाई करत जवळजवळ १ कोटी ५३ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

नागपुरात मिनी लॉकडाऊन
शहरात अत्यावशेवक सेवेच्या नावाखाली दारूचे दुकानेही खुले....शहारात अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल, भाजीपाला, फळबाजार, दूध सुरू असून बाजपेठ हॉटेल रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहे. यात जेवण्यासाठी म्हणून पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. पण यासोबत दारूचे दुकाने खुली कशी? असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. शिवाय दारुची दुकाने खुली ठेवत प्रशासनाने अत्यावश्यक सेवेत त्यांचा समाविष्ट केले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दारू दुकाने खुले ठेवणे दुर्दैवी....नागपूर शहरात दारुची दुकाने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरू असणे हे नक्कीच दुर्दैवी आहे. वैयक्तिक म्हणाला तर ती बंद पाहिजे होते. पण दुकाने चालू ठेवण्याचे अधिकार हे मनपा क्षेत्रातील अधिकारी आणि मनपा आयुक्तांना आहे. तसेच हा विषय जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील असल्याचे तिवारी म्हणाले.
Last Updated : Feb 27, 2021, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details