नागपूर- शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मालिंद नार्वेकर यांनी तब्बल २५ फोन केल्याचा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वांद्रे येथून मला वारंवार फोन येत आहेत. मात्र, हे फोन नेमके कोण करत आहे, याचा खुलासा करणार असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले होते. आज त्यांनी नागपुरात पत्रकारपरिषद घेऊन शिवसेनेकडून फोन येत असल्याचे सांगितले.
सेना प्रवेशासाठी मिलिंद नार्वेकरांचे तब्बल २५ फोन; वडेट्टीवारांचा नागपुरात गौप्यस्फोट - काँग्रेस
वर्षा बंगल्यावरून फोन आलेला नाही, तर वांद्रे येथून नार्वेकरांनी २५ वेळा फोन केला. तसेच पुढील काळात केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देखील देऊ केली, असे त्यांनी सांगितले. मात्र, मला पक्ष बदलायचा नाही. त्यामुळे मी फोन आल्याचे सर्वांना सांगितले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
भाजपमध्ये सध्या मेगाभरती सुरू आहे. त्यामुळे कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे सांगणे सुद्धा कठीण झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या गळाला लागल्यानंतर आता नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील पळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले दिसते. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेलेल्या वडेट्टीवारांना पुन्हा शिवसेनेत बोलवण्यासाठी नार्वेकरांनी फोन केले असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.
वर्षा बंगल्यावरून फोन आल्याचा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, वर्षा बंगल्यावरून फोन आलेला नाही, तर वांद्रे येथून नार्वेकरांनी २५ वेळा फोन केला. तसेच पुढील काळात केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देखील देऊ केली, असे त्यांनी सांगितले. मात्र, मला पक्ष बदलायचा नाही. त्यामुळे मी फोन आल्याचे सर्वांना सांगितले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.