नागपूर - कलम ३७० निरस्थ झाल्यानंतर पाहिल्यांदा काश्मीर विस्थापितांचे दुःख समोर आले आहे. डोळ्यासमोर मृत्यू असताना जीव मुठीत घेऊन नाईलाजाने काश्मीर सारखे नंदनवन सोडावे लागल्याचे दुःख आजही मनात असल्याचे काश्मीरी पंडित सांगतात. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत करून त्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ते कसे बघतात हे देखील जाणून घेतले आहे.
कलम ३७० निरस्थ रद्द ! काश्मीर विस्थापितांनी दिला भावनिक आठवणींना उजाळा - jk news
कलम ३७० निरस्थ झाल्यानंतर पाहिल्यांदा काश्मीर विस्थापितांचे दुःख समोर आले आहे.

केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर संदर्भात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे कलम ३७० आणि ३५ (अ) सारखा जाचक कायदा निरस्थ झाला आहे. केंद्राच्या या भूमिकेचे स्वागत सर्वच स्थरातून होत आहे. अशातच काहींनी विरोध देखील दर्शवलेला आहे. समर्थन आणि विरोधाच्या भूमिका व्यक्त होत असताना काश्मीर विस्थापितांचे जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यांनी या यातना आणि दुःख भोगले आहे.
सध्या नागपुरात काश्मीर विस्थापित असलेले किमान २० ते ३० कुटुंब वास्तव्यास आहेत. केंद्राच्या एका निर्णयाने त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे. १९७९ च्या काळात स्वतः आणि कुटुंबीयांचा जीव मुठीत घेऊन काश्मीर सोडण्यास भाग पडावे लागल्याचे दुःख अजूनही विसरता आलेले नाही. त्या आठवणींना उजाळा देताना आजही त्यांचा कंठ दाटून येत आहे. कलम ३७० च्या माध्यमातून दहशतवादाची सर्वोच्च भीती अनुभवताना समोर दिसणारा मृत्यू आजही आठवत असल्याची प्रतिक्रिया काश्मीर विस्थापितांनी 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना दिली आहे. आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी त्यांच्यासोबत बातचीत करून त्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.