महाराष्ट्र

maharashtra

नागूपर : अंत्यसंस्कारा दरम्यान होणाऱ्या वायू प्रदूषणावर 'निरी'ने विकसित केले 'ग्रीन क्रेमेटोरियल' तंत्र

By

Published : May 15, 2021, 8:48 PM IST

Updated : May 15, 2021, 10:32 PM IST

भारतीय संस्कृतीनुसार मृत पावलेल्या शरीरावर अंत्यसंस्कार करताना अग्नी दिली जाते. त्यावेळी ते मृतशरीर पंचत्त्वात विलीन झाले, असे देखील म्हंटल जाते. भारतातील बहुतांश समाजात अंत्यसंस्कार करताना मृतदेहावर दाहसंस्कार केले जातात. एका मृतदेहाला जाळण्यासाठी सुमारे दोनशे ते तीनशे किलो लाकडाचा उपयोग करावा लागतो.

Green Crematorial
ग्रीन क्रेमेटोरियल

नागपूर - वायू प्रदूषणाच्या मुख्य स्त्रोताकडे लक्ष देण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नीरी कडून एक अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ग्रीन क्रेमेटोरियल नामक या सयंत्राच्या मदतीने मृतदेह जळताना होणार वायू प्रदूषण, विषारी वायू आणि हवेत उडणारी धूळ शोषली जाते. ज्यामुळे अंत्यसंस्कारा दरम्यान होण्याच्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघाला आहे.

वायू प्रदूषण कमी होण्यास होणार मदत...

दिल्लीतील निगम बोध घाटावर बसविले हे यंत्र -

भारतीय संस्कृतीनुसार मृत पावलेल्या शरीरावर अंत्यसंस्कार करताना अग्नी दिली जाते. त्यावेळी ते मृतशरीर पंचत्त्वात विलीन झाले, असे देखील म्हटले जाते. भारतातील बहुतांश समाजात अंत्यसंस्कार करताना मृतदेहावर दाहसंस्कार केले जातात. एका मृतदेहाला जाळण्यासाठी सुमारे दोनशे ते तीनशे किलो लाकडाचा उपयोग करावा लागतो. इतकेच काय तर मृत मानवी शरीर जळत असताना विषारी वायूंसह सुमारे 5 किलो धूळ (राख) वातावरणात मिसळते. यामुळे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. वायू प्रदूषणाचे अनेक कारणे आहेत. मात्र, अंत्यसंस्कार करताना किती प्रमाणात वायू प्रदूषण होत असेल याकडे कधी फारसे लक्षच दिले गेले नाही. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नीरीकडून हे सयंत्र विकसित केले गेले आहे. दिल्ली येथील निगम बोध घाटावरील चार चबूतऱ्यावर हे यंत्र बसवण्यात आली असून भविष्यात देशातील प्रमुख महानगरात हा प्रयोग केला जाऊ शकतो. स्मशानभूमीतून धोकादायक उत्सर्जन कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे.

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना महामारीमुळे स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागलेल्या आहेत. बहुतांश मृतदेहांवर दाहसंस्कार पद्धतीनेच अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रत्येक मृतदेह जळताना पहिल्या तासात पीएम-10 आणि पीएम 2.5 या विषारी पदार्थांचे उत्सर्जन होते. याचा थेट परिणाम स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या परिसरावर होतो. याशिवाय कार्बन, मोनोऑक्साइड, कार्बनडायऑक्साइड, सल्फरऑक्साइड,नायट्रोजऑक्साइड सह हायड्रो कार्बन वायूचे उत्सर्जन देखील होतो. याचाही मानवी शरीरांवर अतिशय घातक परिणाम होतो. ही समस्या निकाली काढण्यासाठी नीरीकडून गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन केले जाते आहे.

हेही वाचा -काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

निरी ही संस्था जल प्रदूषण, वायू प्रदूषणसह सॉलिड वेस्ट प्रदूषणाच्या बाबतीत पुढे येऊन संशोधन करत आहे. यादरम्यान, अंत्यसंस्काराच्या वेळी होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न फार गंभीर झाला असल्यानेच नीरीच्या सिनिअर प्रिन्सिपल सायइंटिस्ट पद्मा राव यांच्या नेतृत्वात ग्रीन क्रेमेटोरियल नामक या सयंत्र तयार करण्यात आले आहे. नीरीकडून विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अनेक चिंता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

ग्रीन क्रेमेटोरियल -

ग्रीन क्रेमेटोरियल हे तंत्रज्ञान हे दिल्ली येथील निगमबोध घाटांवरील चार खुल्या ओट्यांवर बसवण्यात आले आहे. व्हीलोसिटी प्रोफाइलचा अभ्यास करून हे सयंत्र तयार करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात अगदी त्याच्यावर एक छत तयार केली जाते. त्या ठिकाणी डक्टिंग हुड सिस्टम बसवण्यात येते. मृतदेह जळताना अग्नितून निघणारा विषारी वायू, धूळसह सर्व घातक घटक या यंत्राच्या मदतीने शोषले जातात. त्यानंतर स्क्रबिंग सिस्टीमच्या मदतीने ते त्यावर प्रक्रिया केली जाते. यादरम्यान घातक नसणारा वायू पुन्हा वातावरणात सोडला जातो, ज्यामुळे स्मशानभूमीतील वायु प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या वैश्विक संकटातून भारत जिंकणार - मोहन भागवत

Last Updated : May 15, 2021, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details