महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan: ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दोन कोटीचा निधी मंजूर - Maharashtra State Government

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मराठी साहित्य महामंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी २३ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार ५० लाख इतके एकरकमी अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. या वर्षी वर्धा येथे ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी २ कोटी इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंजूर रक्कम २ कोटी पैकी ५० लाख इतके अर्थसहाय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उर्वरीत १.५० कोटी इतके अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Akhil Bhartiya Sahitya Sammelan
मराठी साहित्य संमेलनाला दोन कोटीचा निधी मंजूर

By

Published : Feb 3, 2023, 8:10 AM IST

नागपूर:विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होत आहे. संमेलनासाठी साहित्य नगरी सजली आहे. साहित्‍य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार आहे.



ग्रंथ दिंडीने होईल सुरुवात:उदघटनापूर्वी ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात येणार आहे. दिवसभर या परिसरात भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्‍यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन असे कार्यक्रम राहणार आहे. विविध ठिकाणाहून महामंडळाचे पदाधिकारी, साहित्यिक, प्रतिनिधी वर्धेत दाखल झाले आहेत. पुढचे तीन दिवस साहित्‍य नगरीत साहित्‍याचा जागर होणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदिप दाते याच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत.

प्रमुख उपस्थिती: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्‍याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्‍याक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, स्‍वागताध्‍यक्ष दत्‍ता मेघे यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, खासदार, जिल्ह्यातील आमदार,तसेच आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.



आज साहित्‍य संमेलनातील कार्यक्रम:सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी आचार्य विनोबा भावे सभामंडप येथून निघणार आहे. सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल, दुपारी 2.00 वाजता कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्‍ट्राची प्रबोधन परंपरा विषयावर परिसंवाद, दुपारी 4.30 वाजता संमेलनाध्‍यक्षांचे भाषण, सायं. 5.30 वाजता आम्‍हा लेखकांना काही बोलायचे आहे यावर परिसंवाद, सायं. 7.00 वाजता ललितेतर साहित्‍याची वाढती लोकप्रियवर परिसंवाद, रात्री 8.30 वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन, मनोहर म्‍हैसाळकर सभामंडप, दुपारी 2.00 वाजता कथाक‍थन, सायं. 6.30 वाजता विदर्भातील बोलीभाषावर परिसंवाद, सायं. 8.00 वाजता मृदगंध वैदर्भीय काव्‍यप्रतिभेचा विशेष कार्यक्रम होणार आहेत.


इतर कार्यक्रम:तर आजदुपारी 2.00 वाजता प्रा. देविदास सोटे कविकट्ट्याचे उद्घाटन होणार आहे. दुपारी 2.00 वाजता कविवर्य सुरेश भट गझल कट्टयाचे उद्घाटन, दुपारी 4.00 वाजता ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन होईल. तर संमेलनासाठी साहित्य नगरी सजली आहे. संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍या. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत.

हेही वाचा: Marathi Sahitya Sammelan मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर समारोप करणार उपमुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details