नागपूर- राज्याच्या राजकारणातील आता सगळे जुने समीकरण विसरून जावे लागेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले. राज्याच्या राजकीय परिस्थितीवर ते बोलत होते. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे केवळ आरोप झाले आहे, ते सिद्ध झाले नसल्याचे देखील ते म्हणाले आहे.
'अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याचे आरोप सिद्ध झालेले नाहीत' - अजित पवार
अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे केवळ आरोप झाले आहे, ते सिद्ध झाले नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य म्हणाले.

2014 मध्ये तरी भाजप सेनेची युती नव्हती. तरीही 5 वर्षे सरकार चालले आणि तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीने भाजपला पाठिंब्याचे संकेत दिलेच होते. त्यामुळे राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. म्हणूनच गडकरी म्हणाले होते की, क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते. राष्ट्रवादी तथाकथीत हिंदुत्ववादी सेनेसोबत जाऊ शकते, तर भाजप सोबत का नाही? अडचण कोणालाच नाही. आता ते किती लोक येतात हे विश्वासदर्शक ठरावाच्यावेळीच कळेल, असे वैद्य म्हणाले. अजित पवार यांच्यावर केवळ आरोपच लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर खटला सुरू आहे का?, शिक्षा झाली आहे का? असेही ते म्हणाले. तसेच जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काही नाही, असे म्हणत वैद्य यांनी अजित पवारांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, माझे हे शब्द खरे ठरले-नितीन गडकरी