नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजचे काम लवकरच सुरू होणार आहे. 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकेचे भूमिपूजन झाले आहे. पहिल्या टप्यात नागपूर मेट्रोसेवा सुरू झाल्याने शहराच्या चारही दिशांना प्रवाशांची सोय झाली आहे. या मार्गिकांचा विस्तार शहराबाहेर सुद्धा व्हावा याउद्देशाने कन्हान आणि बुटीबोरी पर्यत विस्ताराचे काम सुरू होणार असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुमारे ७ किलोमीटर मार्गाच्या बांधकामाचा समावेश : केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झाल्यानंतर दोन वर्षांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. महामेट्रोने दुसऱ्या टप्प्यासाठी दोन निविदा काढल्या आहेत. पहिला ४२५ कोटी रुपयांचा आहे. यात ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपासून कामठीपर्यंत सुमारे ७ किलोमीटर मार्गाच्या बांधकामाचा समावेश आहे. दुसरे म्हणजे या मार्गावरील विद्युत खांब, पाण्याच्या पाइपलाइन इत्यादी स्थलांतरित करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा आहे. पुढच्या कामाच्या निविदाही लवकरच काढण्यात येतील. एप्रिल किंवा मे महिन्यापासून या मार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यात ३२ : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या फेज अंतर्गत ३२ स्थानके आहेत. उत्तरेला कन्हान, दक्षिणेला बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर (कापसी ) आणि पश्चिमेला हिंगणा असं एकूण पासून ४३.८ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून 42.6 किमीचा मार्ग आहे.