नागपूर -मेट्रोसाठी ८ हजार कोटींचा निधी शासनाने खर्च केला. तो सामान्य जनतेने कर स्वरूपात शासनाला दिला आहे. मात्र, या मेट्रोचा नागपूरकरांना किती उपयोग होत आहे, असा सवाल करत युवक काँग्रेसने चक्क मेट्रो राईड आंदोलन केले. तसेच तोट्यात असलेल्या मेट्रोला आर्थिक मदत करन्याची मागणी करत युवक काँग्रेसने मेट्रोतच मासिक आढावा बैठक घेतली.
नागपूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांची प्रतिक्रिया
हेही वाचा - नागपूर : दिल्लीत चमकोगिरी करणाऱ्यांना अर्ज दाखल करू देणार नाही - विकास ठाकरे
मेट्रोने सीताबर्डी ते खापरी अंतर गाठायला ताभरचा कालावधी लागतो. त्यापेक्षा कमी वेळेत ऑटोरिक्षाने ते अंतर गाठता येते, असा आरोप काँग्रेसने केला. सामान्य जनतेच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या मेट्रोची सफर किती लोक करतात आणि यातुन महामेट्रोला उत्त्पन्न किती मिळते, असा सवाल देखील युवक काँग्रेसने उपस्थित केला. मेट्रो राईड आंदोलनातून महामेट्रोला निधी मिळावा हा मुख्य उद्देश या आंदोलना मागे असल्याचे काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा - एचसीएलचे चेअरमन शिव नाडर दिसणार संघाच्या मंचावर