नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी केंद्र सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागपूर मेट्रो टप्पा-२ प्रकल्पाला (Metro Phase II Project) मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारने नागपूरच्या विकासाला चालना देणारे मेट्रो टप्पा-२ व नागनदी पुनरुज्जीवन (Nag River Rejuvenation Project) या एकूण ८ हजार ८०८ कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी (approved In Nagpur) दिली. मेट्रो टप्पा - दोन ४३.८ किलोमीटरचा असून ६,७०८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या टप्प्यात नागपूरलगत बुटीबोरी, कन्हान आणि हिंगण्यापर्यंत मेट्रो धावणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत म्हणजे, २०२८ पर्यंत पूर्ण होईल, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील सर्व चारही लाइनला पुढे वाढविली जाणार आहेत. Nagpur City Projects Approved
असा असेल विस्तारीत मार्ग :मेट्रो टप्पा-2 खापरीला बुटीबोरी एमआयडीसी पर्यत जोडणार आहे. हामार्ग १८.६ किमीटरचा असेल तर ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हानसोबत जोडले जाणार आहेत. हा विस्तारित मार्ग १३ किलोमीटरचा असेल, प्रजापतीनगरला कापसी सोबर जोडले जाईल. हा मार्ग ५.५ किलोमीटर असेल तर, लोकमान्यनगरला हिंगणा सोबत जोडण्यात येणार आहे. हा विस्तारीत मार्ग ६.७ किलोमीटर अंतराचा असेल.त्यामुळे बुटीबोरी, कामठी, कन्हान येथून रोज नागपूरला कामा निमित्ताने जाणे-येणेकरणार्यांना फायदा होणार आहे.